Friday, June 10, 2016

भीमराव रामजी आंबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
येवल्याला भाषण देताना बाबासाहेब आंबेडकर
जन्मतारीख:एप्रिल १४, इ.स. १८९१
महापरिनिर्वाण:डिसेंबर ६, इ.स. १९५६
भारतीय घटनेचे शिल्पकार [१]
जन्मस्थान:महू, मध्य प्रदेश
राष्ट्रीयत्व:भारतीय
धर्म:बौद्ध
पत्‍नीरमाई भीमराव आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर ऊर्फ माई (माहेरच्या शारदा कबीर)
अपत्ये:यशवंत भीमराव आंबेडकर
आई:भिमाई रामजी आंबेडकर
वडील:रामजी मालोजी आंबेडकर
आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर (एप्रिल १४, इ.स. १८९१; महू,मध्य प्रदेश - डिसेंबर ६, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. [२].[३]./[४]भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

No comments:

Post a Comment